
सकल संत पादुका दर्शन सोहळाकिर्तन सोहळा २०२५
केडगाव प्रतिनिधी.
तीन दिवसीय कीर्तन सोहळा व सकल संत पूजन, सकल संतांच्या पादुकांचे भाविकांना दिनांक 12 ते 14 ऑक्टोबर 2025रोजी दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे ..हे वर्ष कैवल्य चक्रवर्ती माऊली महा वैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 750 व्या शतकोत्तर जनशताब्दी निमित्त व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या 375 व्या जयंतीनिमित्तया सोहळ्याचे आयोजन केले आहे यामध्ये माऊलीचे अश्व गोल व उभे रिंगण कीर्तन व सांस्कृतिक संमेलन यावेळी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे .
यामध्ये प्रामुख्याने कीर्तने 12 तारखेला वार- सोमवार ह. भ’. प योगीराज महाराज गोसावी पैठण, 13 तारखेला वार- सोमवार ह. भ .प अमृताश्रम स्वामी महाराज जोशी बाबा बीड चार ते पाच या वेळेमध्ये प्रवचन ,रात्री सात ते नऊ या वेळेमध्ये ह. भ .प एकनाथ महाराज नामदास संत श्री नामदेव महाराजांचे सतरावे वंशज पंढरपूर ,14 तारखेला ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली आळंदी यांचे चार ते सहा या वेळेमध्ये काल्याचे किर्तन होणार आहे.या सर्व कीर्तनाचा व संत पादुकांचा दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती ह .भ. प सोपान काका वाल्हेकर तसेच वारकरी सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय महाराज बोरगे पुणे यांनी दिली आहे .
स्थळ- – श्री दत्त गार्डन मंगल कार्यालय सुपा रोड चौफुला तालुका दौंड जिल्हा पुणे.
समन्वयक- श्री संत मुक्ताई ज्ञानपीठ फोन नं. 9890353869,7276553869